रविवार, १० मे, २०२०

सैराट

#समीक्षा 




सैराट पाहीला, Nagraj Manjule यांचे उत्कृष्ट दिग्दर्शन, नवख्या कलाकारांचा अभिनय अगदी कौतुक करण्यासारखा वाटला.

अजय - अतुल यांचे संगीत खुर्चीतून उठून नाचायला भाग पडते. सैराट पहायला आलेले 'अमराठी लोक', यातून सुद्धा चित्रपटाचं यश सर्वार्थाने दिसून येते.

पण..
चित्रपटाचा शेवट अगदीच अनपेक्षीत होता, शेवट पाहीला आणि त्याच क्षणी संपूर्ण चित्रपट पुन्हा डोळ्यांसमोरून निघून गेला, चित्रपटाच्या मध्यांतराच्या आधी सैराट मधील सर्व गाणी आपला राग रंग सोडून नाचायला भाग पडतात, चित्रपटातील विनोदी संवाद चित्रपटगृहातील रिकाम्या खुर्च्यांना सुद्धा हसायला भाग पडतात आणि मध्यांतरानंतर मात्र कथानक असं काही वळण घेतं की चित्रपटगृहातील शांतता थेट बाहेर जाऊन पार्कींग मधील वाहनांना सुद्धा स्थब्ध करून सोडते 

चित्रपटाचा शेवट ज्या उद्देशाने केला तो उद्देश खूप काही विचार करायला भाग पडतो... त्यामागचा अर्थ समजून घेण्यास पुढचे काही क्षण गुंतून राहतात, चित्रपटगृहातून बाहेर पडताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तोच अनपेक्षीत भाव आणि एकच प्रश्न दिसत होता...  "हे असं का झालं?"

... अपूर्ण 
#SrSatish🎭

Follow Me