टीप : या कथेतील सर्व पात्र आणि घटना लेखकाच्या वैयक्तिक जीवनाशी निगडित असून, यातील कोणतीही घटना किंवा पात्र यांचा एखाद्या व्यक्तीशी किंवा घटनेशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
हॅलो कीर्ति 🙏🏻🌹
खूप दिवसांपासून तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. पण, 'कसं सांगू? कुठे सांगू? कधी सांगू?' हे आणि असे अनेक प्रश्न असल्यामुळे 'जे' सांगायचं आहे ते आजपर्यंत राहून गेलंय. एकीकडे असही वाटतं की, 'सांगितले नाही तर शेवटपर्यंत मन आपल्याला खात राहील...'
म्हणून ही सगळी शब्दांची जुळवाजुळव..
आपली मैत्री होऊन आज जवळपास ८-१० वर्षे होऊन गेली आहेत, भगवंत कसे, कुठे, कोणाचे ऋणानुबंध जुळवतील काहीच सांगता येत नाही..
मुळात आपली भेट झाली ती म्हणजे Facebook वर, त्यानंतर आपली मैत्री वाढत गेली काही वर्षांनी आपण एकमेकांचे numbers exchange केले, पुढे मैत्री वाढत गेली, दिवसेंदिवस आपलं बोलणं वाढत गेलं... या सगळ्याच्या दरम्यान आपण एकमेकांना भेटलोही नाही, तुम्ही पुण्यात मी मुंबईत... पुण्याशी माझा संपर्क तेंव्हाच व्हायचा जेंव्हा मी गावी जाताना आमची गाडी तुमच्या शहरातून निघून जायची.. भेटण्याचं जाऊद्या आपण एकमेकांना कॉलही केला नाही, मला असं कुठेतरी वाटायचं की, "असं फोन करून तरी काय बोलायचं?" म्हणून मी सुद्धा कधी तो प्रयत्न नाही केला..
असो..
बरेच दिवसांपासून तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे पण वरील दोन-तीन कारणांमुळे धाडस झालं नाही...
पण आता मात्र माझ्या घरचे जेव्हा माझ्या लग्नाबद्दल विचारतात तेव्हा मात्र माझ्या काळजात धस्स होऊन जातं, कारण मागच्या ५-६ महिन्यांपूर्वी मी तुम्हला एका ठिकाणी कांदेपोहे खायला जाणार आहे ते बोललो होतो, तेंव्हा तुही काहीतरी बोलला होतात की, "तुझ्या मनात कोणी असेल तर आधी घरच्यांना विश्वासात घेऊन सांग नंतर खूप त्रास होतो" वगैरे वगैरे असं काहीतरी तुम्ही सांगितल्याचं आठवत..
आपल्या मनातल्या भावना आपल्याला आवडणाऱ्या मुलीला आपण बोललोच नाही तर संपूर्ण आयुष्य ती खंत मनाला खात राहील म्हणून काहीतरी धडपड करून आपल्या भावना तिच्यापर्यंत पोहोचाव्यात इतकीच काय ती माफक अपेक्षा, पण स्पष्टपणे बोलताही येत नाही..
गेल्या काही दिवसांपासून मी तुमच्याशी chatting मध्ये ज्या मुलीबद्दल सर्व काही बोलतो आहे ती मुलगी म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून तुम्हीच आहात ..
आपली जी मैत्री आहे ती काही दिवसांपासून माझ्या बाजूला मैत्रीच्या थोडं पुढे सरकल्यासारखं मला वाटतंय, मला माहिती नाही काय झालाय? प्रेम वगैरे म्हणतात तसाही काही नाही, पण तुम्ही मला कुठेतरी आवडायला लागलाय.. 🙏🏻🌹
माझ्या या बोलण्यामुळे तुम्हाला हसू येईल... राग येईल... संताप होईल... मला काही समाज नाही, पण एकदाही भेट न होता एकदाही बोलणं न होता असं कोणी कोणाला आवडू शकतं का? असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो..
तुम्हाला थेट मी विचारू सुद्धा शकत नाही कारण एकच म्हणजे, ब्राम्हण आणि मराठा या दोन संस्कृतींमधील अंतर बरंच मोठं आहे.. असंही कुठेतरी वाटतं, ते पार करून तुम्हाला किंवा मला पलीकडे येणे कितपत शक्य आहे, "आणि तुमच्या कुटुंबाला ब्राह्मणेतर मुलगा तुमच्या लग्नासाठी स्थळ म्हणून चालेल का? ... दुसरं म्हणजे तूम्हाला मुंबईची सून व्हायला आवडेल का ??"
खर तर आपली मैत्री ऋषीमुनींच्या कमंडलू मधील पाण्याप्रमाणे स्वच्छ आणि निर्मळ आहे.. त्यामुळे आणखीन एक भीती अशी वाटते ती तुमच्या मनात अस काही असेल नसेल माहिती नाही, तर मग मी विचारून आपली इतक्या वर्षांची मैत्री तुटायला नको ..
हा एक खूप मोठा प्रश्न आणि त्याचे उत्तर मला आजपर्यंत सापडले नाही, त्यामुळे मी कधी त्याबद्दल तुम्हाला विचारलं नव्हतं...
असो..
पुण्याबद्दल असणारी माझी आत्मीयता कशामुळे कशी निर्माण झाली मलाही माहीत नाही. कधी कधी वाटतं की, 'आपल्या जन्म जरी पुण्यात झालेला नसला तरी निदान जावई तरी पुण्याचा व्हावं,' अशी भावना कुठेतरी मनाला नेहमी चाटून जायची, आणि त्यातूनच दुधात साखर म्हणजे तुम्ही स्वतः पुण्याच्या.. आणि माझ्या चेहर्यावर एक स्मित आपोआपच उमटायचं..
ही सगळी शब्दांची जुळवाजुळव करून आज जवळपास दीड वर्ष होऊन गेली आहेत, पण तेंव्हा तुम्हाला सांगण्यास धाडस झालं नाही..
आपण फारच मोजक्या वेळेस फोनवर बोललो आहोत, मला आठवतंय सगळ्यात पहिला आपलं बोलणं झालं तेसुद्धा पवित्र अशा ब्रह्मगिरी पर्वत शिखरावरून, तेव्हा व्हिडिओ कॉल केला होता, सगळ्यात पहिल्यांदा... छान वाटलं होतं त्या वेळेस तुमच्याशी बोलून.. तोही योगायोग काय म्हणावा लागेल, आठ दिवसांपूर्वीच तुम्ही त्रंबकला जाऊन आला होता, त्यानंतर आठ दहा दिवसात आमचं तिथे जाणं झालं, हा योगायोग काही वेगळाच होता.. आणि तेव्हाच ठरवलं होतं ब्रह्मगिरी वरूनच आपण फोन करायचा आणि तो केला..
त्यानंतर एक-दोन वेळा आपले बोलणे झाले, माझ्या वाढदिवसाच्या वेळी तुम्ही फोन केला होता तेव्हा, त्यानंतर काही दिवसांपूर्वी तुमच्या वाढदिवसाच्या वेळ मी फोन केला होता तेंव्हा..
तुम्हाला हे लक्षात आलं असेलच की, मी तुमच्यासोबत बोलताना एकेरी बोलण्याचं सहसा टाळत आलो आहे.. नेहमी "आहो-जाहो" या पद्धतीनेच बोलत राहिलो काही दिवसांपासून.. त्याला करण म्हणजे, मााझी एक अपेक्षा किंवा इच्छा आहे की, मी माझ्या सहचारिणीला तितक्याच सन्मानाने आणि आदराने बोलावणार..!! म्हणून तुमच्यासोबत नेहमीच मी तितक्याच आदबीने बोलत राहिलो..
(कदाचित तुम्हाला या सगळ्याचं हसू सुद्धा येऊ शकतं, सहाजिकच!)
...अपूर्ण
#SrSatish🎭
#SrSatish🎭
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा