टीप : या कथेतील सर्व पात्र आणि घटना काल्पनीक असून, लेखकाच्या वैयक्तीक जीवनातील काही गोष्टी वगळल्या तर, याचा कोणत्याही व्यक्तीशी किंवा घटनेशी काहीही संबंध नाही. जर एखाद्या व्यक्तीशी किंवा घटनेशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा...
रामदेवजी स्वामी (पतंजली योगपीठ ट्रस्ट हरिद्वारचे सर्वेसर्वा) उडपी कर्नाटकमध्ये योग शिबीर घेत आहेत, आज (दिनांक २१ नोव्हेंबर २०१९) पहाटेचा योगसाधनेचा कार्यक्रम पाहिला. त्यात रामदेवजी स्वामींनी एक वेगळा प्रयोग करून दाखविला..
उडपी मठातील एका स्वामींना रामदेवजींनी व्यासपीठावर बोलावले (ज्यांचं वजन जवळपास शंभर सव्वाशे किलो असावं..) आणि त्यांच्या डाव्या हातात एक मोबाईल दिला आणि उजवा हात खांद्याच्या सरळ रेषेत (जसं आपण शाळेत प्रतिज्ञा म्हणताना हात सरळ समोर धरतो अशा तऱ्हेने) हवेत अधांतरी धरायला सांगितले..
रामदेवजींनी त्या स्वामींचा अधांतरी हात फक्त एका बोटाच्या साहाय्याने खालच्या बाजूला अगदी अलगत वाकवला...
मठातील स्वामींना त्याचं काही आश्चर्य वाटलं नाही..
नंतर रामदेवजींनी स्वामींच्या डाव्या हातात असलेल्या मोबाईलचा कव्हर काढून त्यात एक-दोन तुळशीची पाने ठेवली.. आणि पुन्हा उजवा हात अधांतरी धरायला सांगितला..
रामदेवजींनी पुन्हा स्वामींचा अधांतरी असलेला हात खाली दाबण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळी मात्र स्वामींचा हात जागच हलला नाही..
आता मात्र स्वामींसोबत सगळ्यांना आश्चर्य वाटणं स्वाभाविक होतं..
तेंव्हा रामदेवजी म्हणाले की, जेव्हा मोबाईलमध्ये तुळशीची पानं नव्हती तेंव्हा तुमच्या शरीरातील त्राण (ऊर्जा) मोबाईच्या रेडिएशनने कडून घेतले होते आणि नंतर २ तुळशीच्या पानांमुळे मोबाईलच्या रेडिएशनचा परिणाम तुमच्यावर झाला नाही..
रामदेवजी स्वामींच्या या प्रयोगामुळे कित्येक वर्षे मागे जाऊन पाहिलं तर आपल्या हिंदू धर्मात आणि भारतीय संस्कृतीत तुळशीचं महत्व काय आहे हे प्रकर्षाने जाणवते..
रामदेवजींनी करून दाखविलेला प्रयोग सर्वसामान्य बुद्धीला सहज पटनं खरं तर कठीण, किंबहुना अशक्य म्हणावं लागेल. आध्यात्मिक साधना किंवा योगसाधना करणारे लोक याबाबतीत थोडा विचार करू शकतील..
पुराणामध्ये सत्यभामाचा स्वतःच्या संपत्ती आणि संदर्याबाबत असणारा अहंकार दूर करण्यासाठी रुक्मिणी भगवान श्रीकृष्णांची तुला चार तुळशीच्या पानांनी करते आणि तराजूची दोन्ही पारडी एकसमान होतात..
हे आपल्याला माहित जरी असले तरीही स्वतःला विज्ञानवादी मनःवणाऱ्यांना सहज पटणारं नाही, ते या गोष्टीला दंतकथा म्हणून सोडूनही देतील..
त्यावेळी घडलेली गणितं साक्षात भागावंतांनाच ठाऊक.. दोनचार तुळशीच्या पानांमुळे भगवान श्रीकृष्णंची बरोबरी कशी झाली हे मात्र आपणास समजण्यासाठी आपण खूपच लहान आहोत..
पूर्वी आपल्या घरासमोर अंगणात तुळशीवृंदावन असण्यामागचे करण आता नव्याने उलघडते आहे.. पूर्वीचे लोक म्हणत की, "दारात तुळस असेल तर घर शुद्ध राहतं.." ...आणि ते खरंच होतं/आहे.. काही लोक म्हणतात की तुळशीचं झाड २४ तास ऑक्सिजनचा पुरवठा करतं.. पण एवढंस रोपते! असा कितीसा ऑक्सिजन देणार? तुळशीच्या झाडाचे अजूनही खूप दैवी गुण आहेत जे आपल्या सर्वसामान्य बुद्धीला कळण्याच्या पलीकडचे आहेत..
खरं पाहिलं तर या डिजिटल युगात घर शुद्ध राहणं म्हणजे तरी काय? नव्या तंत्रज्ञानामुळे निर्माण होणाऱ्या रेडिएशनचा कमीतकमी परिणाम आपल्या घरावर किंवा परिवारावर होणं!!
मग रामदेवजींनी करून दाखविलेल्या प्रयोगातून आपण नक्कीच काहीतरी शिकू आणि तुळशीचा उपयोग निदान घरातील रेडिएशन कमी करण्यासाठी नक्कीच करू.. 🙏
...अपूर्ण
#SrSatish🎭