टीप : या कथेतील सर्व पात्र आणि घटना लेखकाच्या वैयक्तिक जीवनाशी निगडित असून, यातील कोणतीही घटना किंवा पात्र यांचा एखाद्या व्यक्तीशी किंवा घटनेशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
anish मधील एक अंक संपला.. 🙏🏻
मी कोण? ..कुठला? ..कुठून? ..कसा? ..का? anish परिवारामध्ये आलो, याबद्दल फारसं कोणालाही माहिती नसावं.. अगदी फारच मोजक्या लोकांना ती कल्पना आहे.. anish मध्ये माझं selection करून मला एक जबाबदारीची पोस्ट देऊ केली त्याबद्दल रवी सरांचे खरंतर उपकार म्हणावे लागतील..
एखाद्या व्यक्तीची आणि आपली वेवलेंथ का जमवी, आणि एखाद्याची का जमू नये, याला काही उत्तर नाही.. कित्येक वर्षांच्या परिचयाची माणसं असतात पण, शिष्टाचाराची घडी थोडीशी मोडण्यापलीकडे त्यांचा आपला कधी संबांध जात नाही, की मनाच्या गाठी पडत नाहीत, पण काही माणसं असतात जी जन्म जन्मांतरीचं नातं असल्यासारखा दुवा साधून जातात..
अशीच काहीशी माणसं anish मध्येही भेटली.. (वैयक्तिक कोणाचंही नाव घेणं मी टाळतो आहे..)
इथल्या कामाचा अनुभव नसतानाही आपलंसं करून समजावून सांगणारे डिपार्टमेंट मधील लोक..
नाशिकमध्ये स्वतःचं वाहन नसताना गंगापूररोड पासून कंपनीत येणं म्हणजे एक मोठं दिव्यच म्हणावं लागेल.. त्या प्रवासात साथ दिली ती दोन-चार लोकांनी..
एखाद्या वेळेस सोबत घेऊन जाणारं कोणी नसेलच तर रिक्षाने, बसने कसं जायचं किंवा सोबत घेऊन जात प्रवासाची माहिती करून देणाऱ्या कंपनीतील दोन-तीन मुलींनी अगदी थोरल्या बहिणीप्रमाणे भूमिका बजावली..
कोणाचं उष्ठ कुठल्या गावी किती सांडावं याला काही अंतर नाही.. मुंबईतून नाशिकमध्ये आलो खरा..
पण.... नाशिकमध्ये माझं म्हणावं असं कोणीच नाही.. त्यामुळे कंपनीत असेपर्यंत मला अगदी आपल्या माणसांसोबत असल्यासारखे वाटायचे, पण कंपनीतून निघाल्यावर मात्र रस्त्याने चालताना रस्त्यांवरील दिव्यांच्या प्रकाशात स्वतःची सावली सुद्धा मागेपुढे सरकून साथ सोडून दिल्यासारखा एकटेपणा अगदी दुसऱ्या दिवशी सकाळी कंपनीत येईपर्यंत खायला उठायचा..
त्यातूनच प्रवास सुरु झाला तो म्हणजे मुंबईत नवा जॉब शोधण्याचा..
.. आता जाता-जाता पुलंची दोन वाक्य आठवतात, इथे सखे न सोबती, कोणी इथे कोणी तिथे..
गेल्या अडीज-तीन महिन्यांच्या काळात कंपनीकडून मला काय-काय मिळालं याबद्दल सांगण्यास माझ्याकडे आता तरी शब्द नाहीत. पण एखाद्या काळ्याकुट्ट अंधाऱ्या खोलीत कुठल्याशा झडपेतून सोनेरी सूर्यकिरणं यावीत आणि ती खोली प्रकाशम करून टाकावी, असा काहिरती अनुभव म्हटलं तर त्यात वावगं ठरणार नाही..
माझ्या या अडीज-तीन महिन्यांच्या काळात आपण प्रत्येक दिग्गजांकडून मला खूप काही मिळालं, जे माझं पुढचं भविष्य उजळून टाकण्यास मोलाचं वाटा बजावेल.
इथून पुढे काही दिवस तरी वर्तमानात जगणं तसं कठीणच.. मागील तीन महिन्यांच्या आठवणी सोबत घेऊन चालताना काही दिवस मन मात्र सतत मागे वळून पाहत राहणार यात शंका नाही..
बोलण्यासाठी, सांगण्यासाठी खूप काही आहे, पण त्यासाठी आता मात्र शब्द नाहीत असं झालंय, "Life is a Circle" ..असं म्हणतात, मग भगवंतांची इच्छा असेल तर, भविष्यात पुन्हा आपल्या सगळ्यांसोबत काम करण्याची संधी मिळेल.. 🙏🌹
तसंही प्रत्येक वेळी आपल्याच अंगणातील गुलमोहोर फुलेलच असं नाही.. 🙏🌹



