#समीक्षा
१९६०-७० च्या दशकातील मराठी रंगभूमीचा प्रवास सांगणारी कथा म्हणजे आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर
डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा एकंदर जीवनप्रवास उलगडणारा प्रवास म्हणजे आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर
प्रभाकरपंत पणशीकर आणि डॉ. घाणेकर यांच्या मैत्रीची साक्ष म्हणजे आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर
रंगभूमीवरचे अनभिषिक्त सम्राट डॉ. श्रीराम लागू आणि डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्यातील पडद्यामागील शीतयुद्ध म्हणजे आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर
स्वतःच्या कलेशी एकनिष्ठ असण्याचा आणि रंगभूमीसाठी कराव्या लागलेल्या त्यागाचा डॉ. घाणेकरांचा प्रवास म्हणजे आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर
मराठी रंगभूमीवरच्या पहिल्या नाही तर, अखेरच्या सुपरस्टारची कथा म्हणजे आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर
लेखक दिग्दर्शक अभिजित देशपांडे यांच्या लेखणीतून साकारलेले दिग्गज कलावंत पडद्यावर पाहताना मराठी रंगभूमी आणि मराठी चित्रपट सृष्टी किती समृध्द आणि वैभवशाली आहे याची एक झलक प्रकर्षाने दिसून येते.
सुबोध भावे यांनी साकारलेल्या डॉ. काशिनाथ घाणेकरांची भूमिका पाहताना, आताच्या या पिढीने खूप काहीतरी गमावल्याची जाणीव प्रत्येक फ्रेममध्ये होताना दिसते.
डॉ. घाणेकरांच्या निवडक भूमिका सुबोध भावे यांच्या अभिनयातून पाहताना मराठी साहित्य आणि मराठी रंगभूमीचा गौरवशाली इतिहास नजरेसमोर उभा राहतो.
सुबोध भावे यांच्या अभिनयातून वसंत कानेटकर लिखित संभाजी पाहताना नजरेसमोर साक्षात रायगड उभा राहतो..
घाणेकरांची भूमिका लीलया पेलताना सुबोध भावे यांनी अभिनयात ओतलेला जीव आणि त्यासाठी दिग्दर्शकाने घेतलेली मेहनत या सर्व प्रवासाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते.
प्रभाकर पणशीकर यांच्या भूमिकेत दिसणारे प्रसाद ओक, पंतांच्या दिग्गज आशा अभिनय शैलीला तोड नसल्याची जाणीव करून देतात..
प्रभाकर पणशीकर आणि डॉ. घाणेकर यांची मैत्री पडद्यावर पाहताना 'मित्र असावा तर तो पणशीकरांसारखा हवा.." अशी भावना निर्माण झाल्याशिवाय राहत नाही..
"काय फरक पडतो? सिनेमा आणि नाटक एकच तर आहे..!"
अजिबात नाही! सिनेमा सिनेमा आणि नाटक हे नाटक आहे..!!"
"बेदरकारपणे वावरणाऱ्या वाऱ्यावर समशेर चालवली म्हणून वाऱ्याचा शिरच्छेद होत नाही, की जळके निखारे पाण्यात टाकले म्हणून समुद्र पेटत नाही.."
हे आणि असे अनेक संवाद सर्व कलाकारांचे अभिनय जिवंत करून दाखवतात..
मोहन जोशी यांनी साकारलेले "भालजी पेंढारकर",
आनंद इंगळे यांनी साकारलेले "वसंत कानेटकर",
सोनाली कुलकर्णी यांनी साकारलेल्या "सुलोचना दीदी",
सुमित राघवन यांनी साकारलेले "डॉ. श्रीराम लागू",
सुहास पळशीकर यांनी साकारलेले "मास्टर दत्ताराम"..
या सर्वच भूमिका चित्रपट बोलका करण्यास मदत करतात..
उत्कृष्ट संवाद, प्रत्येक फ्रेम जिवंत करून दाखवणारी क्षमता असलेले अभिजित देशपांडे यांचे दिग्दर्शन कौशल्य आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं तेव्हाच ताकदीचं संगीत चित्रपटाच्या यशामध्ये मोलाचा वाटा उचलतात..
सर्व पाहता चित्रपटा बद्दल एकच म्हणावसं वाटतं..
एकदम कड...क
आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर




