#समीक्षा
स्वतःच्याच भौतिक कल्पनेत तात्यांनी साकारलेलं 'पुष्पक विमान'..
त्यात बसण्याची त्यांची "ती" धडपड..
तुकोबांना भेटण्याचा तात्यांनी घेतलेला घ्यास..
तात्यांना विमान प्रवास घडावा म्हणून विलासने केलेली धडपड..
तात्यांच्या काळजीपोटी आणि प्रेमापोटी त्यांच्या नात-सुनेने तात्यांच्या विमान प्रवासाला दिलेला नकार..
आणि अंती तात्यांना विमान प्रवास घडतो की नाही याची उत्सुकता....
या सगळ्याचा रंजक, विनोदी आणि भावनिक प्रवास म्हणजे 'पुष्पक विमान'..
दिग्दर्शक "वैभव चिंचाळकर" यांनी त्यांच्या शैलीत साकारलेला तात्यांचा संपूर्ण विमान प्रवास आपल्याला सुद्धा एक अनोखा आणि भक्तिमय असा विमान प्रवास घडवून आणतो..
मोहन जोशी यांनी साकारलेला "जळगावी ठसकेदार तात्या" त्यांच्या अभिनयाने आणि त्यांनी साकारलेल्या आजे-सासऱ्याची भूमिका आणि त्यांचे संवाद, नातसून आणि आजे-सासरे यांच्यातील प्रेमळ नात्याचं दर्शन घडवीतात ..
आजोबा आणि नातू यांच्यातील मैत्रीचं घनिष्ट नातं सांगणारा हा प्रवास एका क्षणी चित्रपटाला भावनिक किनार देऊन जातो..
खानदेशी आणि कोकणी-मालवणी भाषेच्या विनोदी शैलीतील काही क्षण पाहताना आपसूकच डोळ्यांत पाणी तराळतं..
आयुष्यात पहिल्यांदाच विमान पाहून विमानाला जोडलेले हात जणू आपणास तात्यांच्या समोर विठ्ठलाच्या उपस्थितीची जाणीव करून देतात..
"राहुल देशपांडे" यांनी साकारलेल्या "तुकाराम महाराजांची" भूमिका ही मोजक्याच फ्रेमची असली तरीही त्यांचे काही संवाद आणि त्यांचे चित्रपटात दिसणे हे चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात ..
राहुल देशपांडे यांनी तात्यांना दाखविलेले पुष्पक विमानाचे भक्तिमय स्वप्न, आणि ते स्वप्न साध्य करण्यात ते तात्यांच्या मागे जणू विठ्ठलाच्या स्वरूपात उभं राहतात अशी जाणीव प्रत्येक वेळी होते..
"मी तुझी सुरुवात आणि तू माझा शेवट.."
संपूर्ण टीम कडून या शब्दांना पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे हे प्रकर्षाने जाणवते..
...अपूर्ण
#SrSatish🎭
#SrSatish🎭
Follow Me





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा