शनिवार, १९ मे, २०१८

ती ..

ती कधी सोबत, तर कधी मनात असते,
कधी डोळ्यांत, तर कधी श्वासांमध्ये असते..

असं म्हणा ना की,
ती हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात असते..

क्षण, दिवस, वर्षे निघून जातात,
पण तिच्या सहवासातील काही क्षण तिच्या असण्याला अर्थ देऊन जातात..

मनातलं जळमट तिच्या आठवणीने पुसून जातं,
म्हणूनच तिची आठवण येता क्षणी मन आसवांमध्ये बुडून जातं..

कोणासाठी ती म्हणजे एक शब्दरूपी व्यक्ती असते,
तर कोणासाठी ती म्हणजे सारं आयुष्य असते..

कधी ती पावसातील रिमझिम सरींप्रमाणे हवी हवीशी वाटते,
तर कधी उन्हाळ्यातील रखरखत्या उन्हासारखी नकोशी होते..

ती ही प्रत्येकाच्या आयुष्यात असते,
कधी भूतकाळात, कधी वर्तमानात तर कधी #ती" भविष्यात भेटते..

"ती" ही प्रत्येकाचं आयुष्य असते..



.... अपूर्ण 
#SrSatish🎭

Follow Me
      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा