रविवार, ६ मे, २०१८

102* Not Out

#समीक्षा 






स्वतःच्याच आठवणींमध्ये रमलेल्या लोकांना भविष्यातील जग नव्या उमेदीने पाहायला लावणारी ही कथा ..

भावनेच्या आहारी न जाता भविष्यातील आयुष्य नव्या उमेदीने जगायला लावणारी ही कथा...

शरीर वृद्ध होण्याआधीच मनावर वृद्धापकाळाच्या छटा दिसू लागल्यानंतरर आपलं उर्वरीत आयुष्य नव्याने आणि आनंदाने जगण्याचा जीवनाचा प्रवास म्हणजे "102 Not Out"

अमिताभ बच्चन यांनी साकारलेली 'दत्तात्रय वखारीया' या १०२ वर्षांच्या तरुणाची भूमिका सध्याच्या स्वतःला तरुण म्हणवणाऱ्या पिढीला सुद्धा आदर्श घालून देईल अशी वाटते..

ऋषी कपूर यांनी साकारलेल्या 'बाबूलाल वाखारीया'ची भूमिका पाहताना त्यांनी मुलगा आणि वडील या दोन्ही नात्यांना न्याय दिलाय असंच प्रकर्षाने जाणवतं..

दिग्दर्शक उमेश शुक्ला यांनी तीन पिढ्यांमधील दाखवलेली भावनिक गुंतागुंत काही वेळा आपलही भूत वातर्मन आणि भविष्य पडताळून पाहण्यास भाग पाडते ..

मध्यंतरापर्यंत हसायला लावणारी प्रत्येक फ्रेम, मध्यंतरानंतर मात्र नात्यांमध्ये असणारा दुरावा चित्रपटाला एक भावनिक किनार देऊन जातो..

"I hope you understand..." या शब्दांभोवती फिरत असणारा चित्रपट शेवटच्या काही फ्रेम मध्ये वेगळी कलाटणी घेतो..

लेखक सौम्म्या जोशी यांनी लिहिलेलं "102* Not Out" या गुजराती नाटकावर आधारित हा चित्रपट उमेश शुक्ला यांनी अतिशय मनोरंजनपणे साकारलाय असं म्हणायला हरकत नाही..


...अपूर्ण 
#SrSatish🎭

Follow Me
   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा