सोमवार, २२ जून, २०२०

मनोगत - Mahindra & Mahindra

 बुधवार दि ३१ जुलै २०१९


Respected all,


गुरुपौर्णिमा, १९ जुलै २०१६, याच दिवशी मी महिंद्रा कॅम्पसमध्ये पहिलं पाऊल ठेवलं आणि भगवंतांच्या साक्षीने पुढचा प्रवास सुरु केला..

.. आता हा असा मराठी मेल पाहून आपणास नक्कीच आश्चर्य वाटेल.. असा प्रयत्न भूतकाळात कधी कोणी केला नसावा किंवा भविष्यात कोणी करेल असं वाटत नाही... खरतर, "It's time to say Good Bye.. Today is my last day in the organization."  .. हे आणि असे E-mails वाचून आपणास सुद्धा नक्कीच कंटाळा आला असेल यात शंका नाही.. म्हणूनच Corporate शिष्टाचाराला थोडी बगल देऊन हा मराठीचा प्रपंच.. आणि त्याचबरोबर इंग्रजीमधून फक्त शब्दांची देवाण-घेवाण होऊ शकते. आपल्या मनातलं चांदणं जर एखाद्याच्या अंगणात पसरवायचं झालं तर, मातृभाषेशिवाय पर्याय नाही, असं मला वाटत.. त्यातूनच आपण सगळे दिग्गज मंडळी, असा मराठीत मेल करणं कितपत योग्य-अयोग्य माहिती नाही.. त्यातूनच आपल्या Busy Schedule मधून २-५ मिनिटं हा मेल वाचण्यासाठी खर्ची पडतील, त्याबद्दल क्षमस्व..

असो..

गेल्या तीन वर्षांच्या काळात कंपनीकडून मला काय मिळालं याबद्दल सांगण्यास माझ्याकडे आता तरी शब्द नाहीत. पण एखाद्या काळ्याकुट्ट अंधाऱ्या खोलीत कुठल्याशा झडपेतून सोनेरी सूर्यकिरणं यावीत आणि ती खोली प्रकाशम करून टाकावी, असा काहिरती अनुभव म्हटलं तर त्यात वावगं ठरणार नाही..


एखाद्या व्यक्तीची आणि आपली वेवलेंथ का जामवी, आणि एखाद्याची का जमू नये, याला काही उत्तर नाही.. कित्येक वर्षांच्या परिचयाची माणसं असतात पण, शिष्टाचाराची घडी थोडीशी मोडण्यापलीकडे त्यांचा आपला कधी संबांध जात नाही, की मनाच्या गाठी पडत नाहीत, पण काही माणसं असतात जी जन्म जन्मांतरीचं नातं असल्यासारखा दुवा साधून जातात..

अशाच काही अवलीयांची साथ मिळाली ती, याच कॅम्पसमध्ये..

चूक असेल तिथे कान धरणारे,
आपल्याकडून काही योग्य काम झालं तर तेंव्हाच पाठीवर हात ठेवून प्रोत्साहीत करणारे,
नवख्या ठिकाणी गेल्यावर आपल्या अंगावर आलेले शब्दांचे बाण स्वतः पुढे होऊन आपल्या छातीवर झेलणारे..
एखाद वेळेस पार्टीमध्ये रात्री हाँगओव्हर झाल्यावर दुसऱ्या दिवशी लिंबू पाणी देऊन थोरल्या भावासारखं थोडा आराम कर म्हणणारे.. सारे दिग्गज इथेच भेटले..

याच तीन वर्षांच्या काळात मला नवीन ओळख सुद्धा मिळाली, कोणी माझ्यात फोटोग्राफर पहिला, तर कोणी माझ्यातील छोट्याशा लेखकाचं कौतुक केलं.. कोणाचं उष्ठ कुठल्या गावी किती सांडावं याला काही अंतर नाही, माझ्या या तीन वर्षांच्या काळात आपण प्रत्येक दिग्गजांकडून मला खूप काही मिळालं, जे माझं पुढचं भविष्य उजळून टाकण्यास मोलाचं वाटा बजावेल.

इथून पुढे काही दिवस तरी वर्तमानात जगणं तसं कठीणच.. मागील तीन वर्षांच्या आठवणी सोबत घेऊन चालताना काही दिवस मन मात्र सतत मागे वळून पाहत राहणार यात शंका नाही..


बोलण्यासाठी सांगण्यासाठी खूप काही आहे, पण त्यासाठी आता मात्र शब्द नाहीत असं झालंय, इथे सखे न सोबती, कोणी इथे कोणी तिथे.. "Life is a Circle" ...असं म्हणतात, मग भगवंतांची इच्छा असेल तर, भविष्यात पुन्हा आपल्या सगळ्यांसोबत काम करण्याची संधी मिळेल.. तसंही प्रत्येक वेळी आपल्या अंगणातील गुलमोहोर फुलेलच अस नाही..


शेवटी जाता जाता एकच म्हणावसं वाटतं .... Thanks to all for Everything!!


--
Satish Shamrao Ravan
+91 9221528097
sr.satish@outlook.com
satish.satrav@gmail.com



---DISCLAIMER---------------------------------------------------------------------------- The contents of this E-mail (including the contents of the enclosure/(s) or attachment/(s) if any) are privileged and confidential material of Mahindra and Mahindra Limited (M&M) and should not be disclosed to, used by or copied in any manner by anyone other than the intended addressee/(s). If this E-mail (including the enclosure/(s) or attachment/(s) if any ) has been received in error, please advise the sender immediately and delete it from your system. The views expressed in this E-mail message (including the enclosure/(s) or attachment/(s) if any) are those of the individual sender. ------------------------------------------------------------------------------------------


...अपूर्ण


#SrSatish🎭

      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा