गुरुवार, २२ फेब्रुवारी, २०१८

साखर नसलेला गोड चहा ☕

स्थळ अर्थात - कोथरूड, पुणे
दिवस- डिसेंबरच्या मध्याचे
वेळ - संध्याकाळची

पुण्यातील थंडीचे दिवस तसे गुलाबीच.. संध्याकाळच्या वेळी चहू बाजूनी येणारी थंडगार बोचरी हवा कशी आल्हाददायक वाटते..

हडपसर च्या IT पार्क मध्ये काम करणाऱ्या ४-५ मित्रांना कोथरूडच्या बस स्टँड जवळ राहणाऱ्या त्यांच्या मित्राकडे चहाला जायची इच्छा झाली, सर्व मित्र अचानक घरी गेले.. 👬👬

घरी पोहचताच मित्राने त्यांचे आनंदाने स्वागत केले, आणि बायकोला चहा बनविण्यासाठी सांगितला.. ☕

बायकोने नवऱ्याला आत बोलावून चहासाठी पुरेशी साखर घरी नसल्याचे सांगितले.. 🙄

नवरा म्हणाला, "तू चहा तसाच  बनव, बिन साखरेचा! पुढे मी बघतो." 😬😇

बायकोने ६/७ कप साखर नसलेला चहा बनवला. (चहा पिणाऱ्यांपेक्षा एक कप चहा जास्तच होता)

नवरा चहा देण्यापूर्वी सर्व मित्रांना म्हणाला, "एका कपात मूद्दाम साखर टाकली नाही. ज्याला तो चहा येईल त्याचेकडे आपण सर्व पूढच्या रविवारी जेवणाला जाउ." 😃

चहा झाल्यावर सगळ्यांना  विचारले,  "कोण आहे तो? पुढच्या रविवारी जेवायला बोलविणारा??" 🤔

सगळे एकमेकांकडे बघत म्हणाले "साखर जरा जास्तच होती" 😋

Note --
This words are Edited by मी, मूळ लेखक कोण आहे माहिती नाही 😬🙄🙁

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा