टीप : या कथेतील सर्व पात्र आणि घटना लेखकाच्या वैयक्तिक जीवनाशी निगडित असून, यातील कोणतीही घटना किंवा पात्र यांचा एखाद्या व्यक्तीशी किंवा घटनेशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
सकाळी ८ ची वेळ. आज नेहमीपेक्षा पाच-दहा मिनिटं मी लवकरच पोहोचलो. डोक्यावरून हेल्मेट काढल्यामुळे अस्ताव्यस्त झालेले केस तसेच होते. पंच करून मधल्या गेटने बाहेर पडताच अचानक #ती दिसली. ती दिसताच केसांवर हात फिरवत स्वतःला सावरण्याचा केवीलवाणा प्रयत्न केला. कॅम्पसमधील झाडांच्या फांद्यांमधून निसटून येणारे सकाळचे कोवळे सोनेरी सूर्यकिरण तिच्या चेहऱ्यावर हलकेसे पडल्यामुळे तिचा चेहरा खूपच तेजस्वी दिसत होता.
शाळा संपल्यानंतर कित्येक वर्षांनी माझा रस्ता पुन्हा एकदा कोणाशीतरी काटकोनात छेदत होता.. (शाळेतील
"ती" आणि आत्ताची "ती" दोघींमध्ये सुज्ञांनी गफलत करू नये.) त्याचवेळी आम्हा दोघांचीही नजरानजर झाली. तीही क्षणभरासाठीच आणि तिच्या नजरेतील निरागस ओलावा माझ्या नजरेतून सुटला नाही. नजरानजर होताच माझ्या काळजात धस्स झालं..
"माझ्या नजरेतील चोरटा भाव तिच्या लक्षात तर आला नसेल ना?", असं कुठेतरी वाटू लागलं..
पण तसं काही घडलं नाही.. पुढच्या क्षणी ती तिच्या मार्गाने निघून गेली आणि मी माझ्या मार्गाने...
तहानलेल्याला पाणी मिळू नये हा तर नियतीचा लाडका खेळ..
...अपूर्ण
#SrSatish🎭




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा